|| श्री नारायणी नमोस्तुते ||
This section presents the divine stories, legends, and folklore associated with Shri. Narayani Devi, passed down through generations of faith and devotion. Each tale reveals the essence and power of the goddess in various forms and times.
The Birth of Narayani Devi
In times of great chaos when demons overpowered the gods, the divine powers of Goddess Lakshmi, Durga, and Saraswati combined to form Shri. Narayani Devi, a supreme manifestation of the feminine divine who would restore Dharma.
She was born from celestial energy and is known to represent power (Shakti), prosperity, and wisdom in one form.
🪔 Source:
Devi Bhagavatam (Skanda 5, Chapters 1–5)
Devi Mahatmya, Chapter 2
Read More – The Devi Bhagavatam: The Fifth Book: Chapter 1 | Sacred Texts Archive
श्री नारायणी देवी चे दर्शन श्री स्वप्नील जिरागे
(किल्ले आणि इतिहास)
July 8, 2025
Abstract
सदर लेखात श्री नारायणी देवीच्या एका दर्शनाचा वृत्तांत प्रस्तुत के ला आहे.
श्री नारायणी देवी चे दर्शन.
अश्विन शुद्ध सप्तमी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई
अंबाबाई आज श्री नारायणी रूपात सजली आहे. या रूपामध्ये करवीर निवासिनीच्या पाठीमागे सप्तशती
महायंत्राचे तसेच सप्तमातृकांचे दर्शन घडते आहे. मध्यभागी बिंदू स्थानावरती सर्वस्याद्यशक्ती श्री
महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये म्हाळुंग गदा ढाल आणि पानपात्र ही आयुध धारण करून
सिंहावर विराजमान आहे. जगदंबेचे हे रुप नारायणी या नावाने देखील ओळखले जाते. नारायणी
म्हणजे नारायणाची म्हणजेविष्णू ची पत्नी म्हणून नारायणी नव्हे तर, नारायणी म्हणजे जगताचा सांभाळ
करणारी शक्ती म्हणजे नारायणी. जिच्याकडे जगत घडवण्याची सांभाळण्याची आणि मोडण्याची ताकद
आहे ती शक्ती म्हणजे नारायणी. करवीर निवासिनीला विष्णू पत्नी म्हणून महालक्ष्मी म्हणणेजितकं
चुकीचं आहेतितकं शिवपत्नी म्हणून अंबाबाई म्हणून सुद्धा चुकीचं आहे . ती शिवाची पत्नी आहे ना
विष्णूची पत्नी आहे. ती ब्रम्हा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांना जन्म देणारी सर्वस्यआद्य शक्ती आहे.
आदिशक्ती आहे त्यामुळे महालक्ष्मी म्हणजेविश्वाचे परब्रम्ह तर अंबाबाई म्हणजे जगताची माता या दोन
नावानेतिला ओळखलं जातं. आज आपल्या या मूळ स्वरूपामध्ये सप्तशती महायंत्रासह, त्याच्यामध्ये
मूळ त्रिकोण जिथे महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्यानंतर षटकोन अष्टदळ आणि 24 पाकळ्यांच्या
कमळासह भूपुरामध्ये या यंत्राची पूजा के ली जाते. दुर्गासप्तशतीमध्ये वर्णन के लेल्या सर्वदेवतांची
पूजा या यंत्रामध्ये असते आणि या यंत्राची अधिष्ठात्री देवता आहे श्री क्षेत्र करवीर निवासिनी महालक्ष्मी
अर्थात आई अंबाबाई कारण सगळी सप्तशती शेवटी हिच्याच भोवती फिरते. श्रीमातृ चरणारविंदस्य
दास प्रसन्नसशक्तिकः